महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे 11 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली - शिष्यवृत्ती

कोरोना विषाणूचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करणे सरकारला शक्य झाले नाही.

Wardha District News
वर्धा जिल्हा बातमी

By

Published : Jul 29, 2020, 10:36 PM IST

वर्धा - कोरोना विषाणूमुळे व्हिजेएनटी आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गाना दिली जाणारी 11 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अप्राप्त आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर झालेली नाही. यासह अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसह इतरांंना लागणारी कागदपत्रे देताना शिष्यवृत्तीचे कारण पुढे करत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना विषाणूचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करणे सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळे काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांची अनुज्ञेय शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त असल्यामुळे कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु, नये. यासह विद्यार्थ्यांना कागपत्रे देताना शिष्यवृत्तीचे कारण पुढे करून त्यांची अडवणूक करु नये, अशा सुचना सहाय्यक समाज कल्याण आयुक्त अनिल वाळके यांनी दिल्या शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत.

11 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित -

जिल्ह्यातून व्हीजेएनटी आणि इतर मागर्सवर्गीय विद्यार्थ्यांची 24 हजार 913 जणांची यादी पाठवली आहे. ही यादी जिल्ह्यातील शिंक्षण संस्थांकडून मिळाली असून त्यातील त्रुटी काढून ही यादी बहुजन कल्याण संचांलनालाय पुणे आणि इतर मागसवर्गीय मंडळ यांच्याकडे ऑनलाइन पाठवण्यात आली आहे. यापैकी 24 हजार 200 प्रकरण प्राप्त आहेत. तर 12 हजार 539 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली.

दरम्यान, आता 11हजार 661 विद्यार्थ्यांचे प्रकरण प्रलंबित आहे. संबंधित यंत्रणेकडे रक्कम प्राप्त होताच हे प्रकरण लवकरच निकाली काढले जाणार असल्याची माहिती सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details