महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अधुऱ्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेत संपवले जीवन - wardha suicide

प्रेमसंबधात असुनही लग्न होऊ शकत नसल्याने दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. छगन उर्फ बंटी गिरी (वय २४) आणि रजनी दिलीप तुमडाम (वय २१) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.

विहिरीतील मृतदेह

By

Published : Feb 20, 2019, 9:07 PM IST

वर्धा- जिल्ह्यातील खरांगणा येथे एका शेतात बुधवारी सकाळी तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. प्रेमसंबधात असुनही लग्न होऊ शकत नसल्याने दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. छगन उर्फ बंटी गिरी (वय २४) आणि रजनी दिलीप तुमडाम (वय २१) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.

घटनेची माहिती देताना पोलीस

तरुणीचा दुसऱ्या एका मुलासोबत साखरपुडाही झाला होता. त्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकणार नसल्याने अधुऱ्या प्रेमकहाणीचा अंत त्यांनी जीवन संपवून केला. मदनी येथील युवराज पुनवटकर यांना शेतामध्ये काम करत असताना विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानी याबाबतची माहिती पोलीस पाटील अमित धोपटे यांना दिली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. याचा तपास करत असताना मंगळवारी संध्याकाळी गावातून छगन आणि रजनी हे दोघे पळून गेल्याची माहिती समजली. त्यामुळे हे मृतदेह या दोघांचे असल्याची खात्री पटवण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविलेले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार संतोष शेगावकर यांनी दिली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details