महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधींचे भाषण निव्वळ मनोरंजनासाठी टिव्हीवर दाखवले जाईल - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली. ते हिंगणघाट येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

संपादीत फोटो

By

Published : Apr 8, 2019, 10:38 AM IST

वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली. टीव्ही चॅनलवाले राहुल गांधी यांचे भाषण दाखवण्याआधी याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, राहुल जे बोलत आहेत ते सर्व काल्पनिक आहे, असा मजकूर दाखवतील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते हिंगणघाट येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

हिंगणघाट येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी यांची वर्धा येथे प्रचार सभा झाली होती. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, राहुल यांचे भाषण निव्वळ मनोरंजनाकरता टिव्हीवर दाखवले जाईल, अशाप्रकारची अवस्था आहे. तसेच काँग्रेसच्या ७२ हजार रुपयांच्या घोषणेवर त्यांनी टीका केली. कोंबड्या विकण्याचा धंदा बंद करा, असेही फडवीस म्हणाले.

यावेळी भाजप उमेदवार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, रिपाइंचे जि.प. सदस्य विजय आगलावे आदी मंचावर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details