वर्धा - शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. म्हाडा कॉलनी परिसरातून भगवा निळा हिरवा रंगाचे झेंडे दाखवत रॅलीला सुरवात करण्यात आली.
वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात - छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त मराठा सेवा संघाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन.
वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात
चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य जय्यत तयारी करण्यात आली होती. पुतळ्याला सकाळपासून अनेकानी माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, मराठा सेवा संघ, क्षत्रिय मराठा सेवा संघ आणि शहरातून अनेक संघटनांनी रॅली काढत चौकातील प्रतिमेला अभिवादन केले. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ वानखडे, सचिव सुधीर गिर्हे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नीरज बुटे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.