वर्धा- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांकरीता आलेली औषधे बाहेरील व्यक्तीला विकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लगेच या कर्मचाऱ्याची बदली करत चौकशी सुरू केली. मात्र, या धक्कादायक प्रकाराने सामान्य नागरिकांसाठी असणारे औषध विकले जात असल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. विलास रघाताटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सामान्य नागरिकांना मोफत औषध उपलब्ध करून दिले जाते. पण त्यांच्या हक्काचे औषध हा कर्मचारी पैसे घेऊन विकत होता. हा कर्मचारी कक्षसेवक म्हणून येथे कार्यरत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करत त्याची कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.