वर्धा - चोरटे केव्हा काय चोरतील याचा नेम नाही. आजपर्यंत घरापुढे लावलेले बल्ब चोरीला जातील असे वाटले नसेल. पण वर्ध्यातील विरूळ गावात हे घडले. जवळपास 12 बल्ब चोरील गेले असून चोरांनी ते विकून दारू पिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी बल्बच्या वायर कापून होल्डरही चोरले आहेत. स्थानिक या त्रासाला कंटाळे असून बल्ब चोरीची तक्रार पोलिसात दाखल करणार असल्याचे ते म्हणत आहेत.
बल्ब, होल्डरवरही डल्ला; वर्ध्यात भुरट्या चोरांचा त्रास - वर्धा पोलीस
वर्ध्यातील विरुळ गावात हे घडले आहे. जवळपास 12 बल्ब चोरील गेले असून, चोरांनी चक्क ते विकून दारू पिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वर्ध्यात चोरांनी चक्क बल्ब चोरले
हेही वाचा - 'खोटी आश्वासने देणाऱ्या लोकांच्या स्पर्धेत केजरीवालांना मिळेल पहिले बक्षीस'
चोराने एका कुटुंबाच्या घरी सगळ्याच बल्बची चोरी केल्यामुळे घरातील वृद्ध महिलेने प्रचंड संताप व्यक्त केला. ती म्हणाली, "मी हा बल्ब उधारीने आणला होता. अजून दुकानदाराचे पैसेसुद्धा दिलेले नाहीत, त्याआगोदरच चोरांनी बल्ब चोरून नेला."
Last Updated : Jan 24, 2020, 3:34 PM IST