महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात बसपचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदोलन - Wardha

येत्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेटपेपरचा वापर करून मतदान घ्यावे, वीज दरवाढ कमी करून एमएसईडीसीएलच्या विद्युत मंडळाची मनमानी अरेरावी थांबवावी, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करून पीकविम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने जमा करावी. या सह इतर मागण्यासाठी बसपने वर्ध्यात आंदोलन केले.

वर्ध्यात बसपचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदोलन

By

Published : Jul 20, 2019, 10:01 PM IST

वर्धा -बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी आणि सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन बसपच्या वतीने धरणे देत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्याना पाच मागण्याचे निवेदन देण्यात आले.

वर्ध्यात बसपचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदोलन

येत्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेटपेपरचा वापर करून मतदान घ्यावे, वीज दरवाढ कमी करून एमएसईडीसीएलच्या विद्युत मंडळाची मनमानी अरेरावी थांबवावी, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करून पीकविम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने जमा करावी, जंगलालगत शेतजमिनीचे संरक्षण आणि वन्यप्राण्यांच्या त्रासाची शेतकर्‍यांची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करून रुग्णांना औषध पुरवठा करावा, पीककर्जाकरता शेतकर्‍यांना होणार्‍या नोड्यूचा त्रास रद्द करा, जिल्ह्यात महसुली जागेवर राहणार्‍या नागरिकांच्या घरपट्ट्यांचा प्रश्न निकाली काढा, महाकाली काचनूर येथील वनविभागाच्या जमिनीबाबतची समस्या दूर करा, नागरिकांना जागेचा कायमचा मालकीहक्क द्या, आदी मागण्यांकरता हे धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात बसपचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, जिल्हा संयोजक अनोमदर्शी भैसारे, विलास टेंभरे, जिल्हा महिला संयोजिक हेमलता शंभरकर, जिल्हा प्रभारी मनिष चवरे, धर्मपाल गायकवाड, राजेश लोहकरे सह अनेकजण उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details