वर्धा- मागील २४ तासात जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाल्याने आष्टी तालुक्यातील जाम नदीवर पर्यायी बांधलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे याचा परिमाण वाहतुकीवर झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्यामार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे वाहतूक मध्यप्रदेश भोपालकडून येणारी राष्ट्रीय वाहतूक प्रभावित झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून, वाहतूक वळवल्याने २० किलोमीटरचा फेरा
मागील २४ तासात जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाल्याने आष्टी तालुक्यातील जाम नदीवर पर्यायी बांधलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे याचा परिमाण वाहतुकीवर झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्यामार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे वाहतूक मध्यप्रदेश भोपालकडून येणारी राष्ट्रीय वाहतूक प्रभावित झाली आहे.
मध्यप्रदेश आणि भोपालकडून येणाऱ्या वरुड-आष्टी मार्गवरील धाडीनजीक जाम नदीवरील मुख्य पूलाच्या उंचीचे काम सुरू आहे. यामुळे पर्यायी पूल बांधून वाहतूक सुरु होती. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यायी पूल खचून पुलाचा मध्यभाग वाहून गेला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. यात पाऊस अजून सुरु असल्याने दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही. यासाठी ही वाहतूक वळवण्यात आली आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगांव, बोरगांव टूमनी, साहूरमार्गे अमरावती जिल्ह्यातील वाहतूक वरुडकडून वळवण्यात आली. तसेच वरुडकडून नागपूरला जाण्यासाठी साहूर, माणिकवाडा, नारा, काकडा, सुसुन्द्रा, कारंजा, होर राष्ट्रीय महामार्ग ६ वर वळवण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास हा पूल वाहून गेला. याचवेळी या रस्त्यावर असणारे चार ट्रक थोडक्यात बचावले. २५ मीटर लांबीचा हा पूल असून कामाची गती संथ असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.