वर्धा -मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान मंदिराजवळ उब्दा शिवारात आज (09 नोव्हेंबर) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. कुणाल गणेश तामगाडगे (वय १७), असे मृत मुलाचे नाव आहे.
दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू - कुणाल गणेश तामगाडगे
मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान मंदिराजवळ उब्दा शिवारात आज (9 नोव्हेंबर) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. कुणाल गणेश तामगाडगे (वय १७), असे मृत मुलाचे नाव आहे.
हेही वाचा - सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून ४ घरफोड्या, तर एका दुकानातील मुद्देमाल लंपास
कुणाल नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वाकला जात होता. हनुमान मंदिरावळ जाम वरून हिंगणघाटकडे भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीने त्याला जबर धडक दिली. मित्रांनी त्याला लागलीच समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराअगोदरच डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले. दरम्यान, अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करत आहेत.
TAGGED:
कुणाल गणेश तामगाडगे