वर्धा - वर्ध्याच्या सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत बजाज फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या तगाद्याने एकाने आपली जीवनयात्रा संपवली. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीचा चेक बाऊन्स झाल्याने हा तगादा लावला जात असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले. झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कृष्णां शामराव देवतळे असे मृत इसमाचे नाव आहे.
वर्ध्यात कर्ज वसुलीच्या तगाद्याने कर्जदाराची आत्महत्या - वर्धा क्राईम न्यूज
कृष्णा देवतळे सेलूच्या खाजगी कंपनीत काम करत होते. यात त्यांनी बजाज फायनान्स कडून कर्ज काढून घेतले होते. पण त्याची इन्स्टॉलमेंट थकवली. यात फायनान्स कंपनीला दिलेला चेक बाऊन्स झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तगादा सुरू केला. शनिवारी त्यांचा गळफास लावलेला मृतदेह महाबळा केळझर दरम्यान दफतरी पेट्रोल पंपाजवळ आढळून आला.
कर्जदाराची आत्महत्या