नरेंद्र मोदी नावाचा अर्थ सांगणारे मोदी समर्थक - sabha
महाराष्ट्रातील मोदींच्या प्रचार सभेला वर्ध्यातून सुरुवात झाली. ही सभा ऐकण्यासाठी मोठा उत्साह पदाधिकाऱ्यांच्यात पाहायला मिळत होता.
वर्धा - भारतीय जनता पक्ष नेहमीच शब्दांचा खेळ खेळण्यात सर्वात पुढे असते. कोणत्याही योजनेचे नाव असो किंवा काँग्रेसवर टीका करायची असो, भाजप अक्षरानुसार अर्थ बनवण्याचा प्रयत्न करते. पंतप्रधाननाची सोमवारी वर्धात सभेदरम्यान असाच काही प्रत्यय पाहायला मिळाला. यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रचार व्हावा या अनुषंगाने वर्धातील जाहीर सभेत कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाचा एकेका अक्षराचाअर्थ लावला.मोदी समर्थकांच्या या प्रचार तंत्राविषयी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.....