महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुमच्या भाऊजींनी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हेही सांगा; स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल - दादाराव केचे वर्धा प्रचार सभा

ज्यांनी देशातील गरिबांना लुटण्याचे पाप केले, तेच लोकतंत्राच्या गोष्टी करत आहेत. तुमच्या भाऊजींनी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हेही राहुल गांधींनी सांगावे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. आर्वी येथे भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

By

Published : Oct 19, 2019, 4:21 AM IST

Updated : Oct 19, 2019, 10:57 AM IST

वर्धा -आज काँग्रेसचे अनेक भ्रष्ट नेते कारागृहात आहेत. ज्यांनी देशातील गरिबांना लुटण्याचे पाप केले तेच लोकतंत्राच्या गोष्टी करत आहेत. तुमच्या भाऊजींनी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हेही राहुल गांधींनी सांगावे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. आर्वी येथे भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

आर्वीच्या सभेत स्मृती इराणींची राहुल गांधींवर टीका
स्मृती इराणी यांनी त्यांच्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलत त्यांनी उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळवला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ५५ वर्षे राज्य करणारी काँग्रेस इतक्या वर्षात ना शौचालय देऊ शकले ना सिलेंडर. ते मोदींवर टीका करतात. ज्या राजकुमाराच्या आईने चुलीवर स्वयंपाक केला नाही, त्यांना आईचे दुःखकळणार नाही.आज गरीब कुटुंबातील माणूस पंतप्रधान झाला हे काँग्रेसला सहन होत नाही, असे म्हणत त्यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.

हेही वाचा -भाजपच्याच शेतकरी कार्यकर्त्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - राहुल गांधी

यावेळी मंचावर माजी खासदार विजय मुळे, माजी आमदार दादाराव केचे, भाजपचे सुधीर दिवे, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते. सुधीर दिवेंसह दादाराव केचे यांनीही नागरिकांना संबोधित केले.

Last Updated : Oct 19, 2019, 10:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details