वर्धा - लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सुरू होण्यासाठी अवघे काही तास आता शिल्लक राहिले आहे. अशातच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमानवार यांनी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. उद्या सकाळी ७ वाजतापासून जिल्ह्यातील २०२६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमानवार यांनी केले आहे. यावेळी दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उन्हाचा तडाखा वाढलेले तापमान पाहता सुद्धा विशेष नियोजन करण्यात आले आहे.