महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात निवडणुकीची जोरदार तयारी, विविध अॅपच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया होणार सुलभ

१८ मार्चला अधिसूचना जारी होऊन नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख १५ मार्च असेल. २८ मार्चला उमेदवारी मागे घेता येईल. तर, २९ मार्चला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करुन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

By

Published : Mar 12, 2019, 4:48 PM IST

जिल्हाधिकारी

वर्धा - लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे देशभरात निवडणुकांचे वातावरण तापले आहे. वर्धा जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

जिल्हाधिकारी पत्रकार परिषद

१८ मार्चला अधिसूचना जारी होऊन नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख १५ मार्च असेल. २८ मार्चला उमेदवारी मागे घेता येईल. तर, २९ मार्चला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करुन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

वर्ध्यातील मतदार आणि मतदारसंघ -
वर्ध्यात ४ विधानसभा मतदारसंघ आहेत. २ मतदारसंघ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले आहेत. यात धामणगाव आणि मोर्शीचा समावेश होतो. वर्धा लोकसभा मतदारसंघात १७ लाख २४ हजार ५२१ मतदार आहेत.

दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था -
जिल्ह्यात ४३९१ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदार केंद्रांवर पोहोचण्यासाठी रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने सुलभ निडवणुका असे आपले ब्रीदवाक्य ठरवले आहे. त्यानुसार आयोग व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.

सुलभ निवडणुकीसाठी 'समाधान' अॅप -

निवडणूक आयोगाने अॅपची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सी व्हीजीजलन्सच्या माध्यमातून रियल टाईम व्हीडिओ काढून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. प्रचार कार्यालयासाठी परवानगी घेताना 'सुविधा' प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा होणार आहे. नागरिकांच्या शंकांचे निराकारण करण्यासाठी 'समाधान' अॅपमुळे मदत होणार आहे. तर, शासकीय वाहने अधिग्रहीत करण्यासाठी 'सुगम' अॅप असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details