महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेळता-खेळता त्याचा जीव गेला... समुद्रपूरमध्ये हळहळ! - samudrapur police

समुद्रपूर तालुक्यात रेनकापूर येथे अंगणात खेळताना पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला.संबंधित घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. प्रथम उर्फ गणेश राजू निखाडे असे या बालकाचे नाव आहे.

child died in wardha
समुद्रपूर तालुक्यात रेनकापूर येथे अंगणात खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला.

By

Published : Jun 13, 2020, 1:18 PM IST

वर्धा - समुद्रपूर तालुक्यात रेनकापूर येथे अंगणात खेळताना पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. संबंधित घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. प्रथम उर्फ गणेश राजू निखाडे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

प्रथम घराच्या अंगणात खेळत होता. त्याची सात वर्षांची बहीण चैताली देखील याच ठिकाणी खेळत होती. बहिणीचे दुर्लक्ष झाल्यानंतर प्रथम पाण्याच्या टाकीजवळ गेला. यावेळी तोल जाऊन तो पडला; आणि नाका-तोंडात पाणी गेल्याने बेशुद्धावस्थेत गेला. काही वेळात बहीण चैताली त्या ठिकाणी आली. हा प्रकार पाहताच तिने पालकांना बोलावले.

वडिलांनी तत्काळ बाहेर काढून त्याला समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजू निखाडे हे शेतकरी असून ते दुधाचा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details