महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात तीन दिवसात 76 हजार कुटुंबांनी केली शिधा उचल

जिल्ह्यात तीन दिवसात 76 हजार शिधापत्रिका धारकांनी धान्याची उचल केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Wardha district ration
वर्ध्यात तीन दिवसात 76 हजार कुटुंबांनी केली शिधा उचल

By

Published : Apr 4, 2020, 8:10 AM IST

वर्धा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राशन दुकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोकांना तीन महिन्याचे धान्य मिळणार असल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. याचाच परीणाम म्हणून राशन दुकानांनासमोर गर्दी पाहायला मिळाली. यामध्ये जिल्ह्यात तीन दिवसात 76 हजार शिधापत्रिका धारकांनी धान्याची उचल केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित शिधा धारकांना लवकरच धान्य देणार असून यात गोंधळ न करता सोशल डिस्टनसिंगचे पालन करत धान्य वाटप करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

वर्ध्यात तीन दिवसात 76 हजार कुटुंबांनी केली शिधा उचल

जिल्ह्यात 850 रास्तभाव दुकाने आहे. त्यांच्या माध्यमातून 2 लक्ष 67 हजार 481 शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जाणार आहे. आता 1 लाख 91 हजार धारकांना वाटप केले जाणार आहे. यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी यांना 2 रुपये किलो गहू, आणि 3 रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप केले जाणार आहे. तीन महिन्याची शिधा एकत्रितपणे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यात नव्याने बदल केला. आता त्या महिन्याचे अन्नधान्य त्याच महिन्यात देण्यात येणार असल्याने शिधा धारकांनी नोंद घ्यावी. गोंधळ न उडवता सर्वाना धान्य मिळेल याची काळजी घेतली जाणार आहे. नुकतेच पालकमंत्री यांनी बैठक घेत कुठल्याच कुटुंबातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, अशी जबाबदारी घेतल्याचे सांगत प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिले आहेत.

वर्ध्यात तीन दिवसात 76 हजार कुटुंबांनी केली शिधा उचल

देशातील आपात्कालिन परिस्थिती पाहता शिधा धारक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ तीन महीने मोफत देण्यात येणार आहे. यासाठी 5 हजार 366 मेट्रिक टन तांदुळाचे नियतन प्राप्त झाले आहे. पॉस मशीनमध्ये याची सुविधा उपलब्ध होताच त्याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. याचा लाभ सुमारे साडे दहा हजार लाभार्थ्यांना होणार आहे. यामुळे गोंधळ टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लवकरच गरजू कुटुंबांना हे धान्य वाटप केले जाणार आहे.

राशन धान्य दुकानात गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून गर्दी होणार नाही. गरज पडत असल्यास ग्रामीण भागात सरपंच, पोलीस पाटील आणि शहरी भागत नगरसेवकांची मदत घेण्याचे सांगितले आहे. सोशल डिस्टनसिंग पाळत धान्य वाटप करावे. एका राशन दुकानदाराकडे 350 पेक्षा जास्त शिधाधारक असल्यास स्वयंसेवी संस्था किंवा एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी आणि हात धुण्यासाठी हँडवाश सुद्धा ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. या नियांनाचे पालन न केल्यास राशन दुकान धारकांवर सुद्धा कारवाई केली जाईल, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details