वर्धा -कोविड 19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकांना घरात राहण्याचे आवाहन करून सुद्धा रस्त्यावर येताना दिसत आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रशासकीय यंत्रणेने कारवाई करत त्यांच्यावर दंड ठोठावला आहे. पोलिसांना आतापर्यंत 11 लाख 43 हजार रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे.
नागरिकांकडून होणारे कायद्याचे उल्लंघन हे कोरोनाचा प्रादुर्भावाला आमंत्रण आहे. यामुळे जिल्ह्यात मागील दिवसाची आकडेवारी पाहता 174 गुन्हे दाखल करत करण्यात आले. शिवाय 347 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
वर्ध्यात संचारबंदी उल्लंघनामुळे 174 गुन्हे दाखल; 11 लाख रुपयांची पोलिसांकडून वसूली - वर्ध्यात संचारबंदी
नागरिकांकडून होणारे कायद्याचे उल्लंघन हे कोरोनाचा प्रादुर्भावाला आमंत्रण आहे. यामुळे जिल्ह्यात मागील दिवसाची आकडेवारी पाहता 174 गुन्हे दाखल करत करण्यात आले. शिवाय 347 वाहनावर कारवाई करण्यात आली.
अत्यावश्यक सुविधा देताना सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडणार नाही, असे नियोजन करण्यात आले. यामध्ये भाजी बाजाराचे वेग वेगळया ठिकाणी स्थलांतरीत करणे. दुकानापुढे सुरक्षित अंतर ठेवणे. 34 ठिकाणांना शोधून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वयंसेवी संस्था, एनसीसी, एनएसएस, माजी सैनिक संघटना सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना जवाबदारी सोपवण्यात आली. याच्या माध्यमातून भाजी बाजार सह, 139 बँका आणि जवळपास 850 रेशन दुकानासमोर होणारी गर्दी टाळण्यात आली आहे.