वाशिम- कौटुंबिक वादातून आपल्या पोटच्या दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना शेलुबाजार येथे घडली आहे. शौर्य माहुलकर असे मृत मुलाचे नाव आहे. संगीता माहुलकर असे आरोपी आईचे नाव आहे.
दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने फेकले विहिरीत; शेलुबाजार येथील घटना
कौटुंबिक वादातून आपल्या पोटच्या दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना शेलुबाजार येथे घडली आहे.
मृत शौर्य माहुलकर
हेही वाचा - रिसोड शहरात चाकूने भोसकून युवकाची हत्या
शेलुबाजार येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या संगीता माहुलकर हिने दोन दिवसांपूर्वी शौर्यला विहिरीत फेकले. आज त्यांचे पती विठोबा माहुलकर यांनी मंगरुळपीर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाचा शोध घेतला. तेव्हा विहिरीत मुलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Last Updated : Oct 7, 2019, 10:09 AM IST