सांगली - सांगलीतील कोरोना नियंत्रण कक्षात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी (दि. 24 जुलै) जिल्हा परिषदेच्या कोरोना नियंत्रण कक्षातील एका अधिकार्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या घशातील स्त्राव (स्वॅब) घेण्यात आले होते. यामध्ये आणखी सहा जणांना कोरोना लागण झाल्याने निष्पन्न झाले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
सांगली : कोरोना नियंत्रण कक्षातील आणखी सहा जणांना लागण - सांगली कोरोना आकडेवारी
सांगलीच्या कोरोना नियंत्रण कक्षातील आणखी सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षाताच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याठिकाणी असणाऱ्या एका अधिकाऱ्याला कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्या ठिकाणी असणाऱ्या एका अधिकाऱ्याला ताप आणि कोरोनाची लक्षण आढळून आल्याने गुरुवारी स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वच प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली होती.
त्यानंतर प्रशासनाने जिल्हा परिषदेची संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करत औषध फवारणी केले होते. त्याचबरोबर या कक्षातील कर्मचारी, अधिकारी यांच्यासह 54 जणांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आले होते. यामध्ये आणखी एका अधिकार्यासह पाच कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. तर या ठिकाणी कार्यरत असणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, कोरोना नियंत्रण कक्षातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये आणखी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेला आहे.