महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत नव्या 1 हजार 511 कोरोना रुग्णांची भर ; तर 78 जणांचा बळी

By

Published : Jul 2, 2020, 6:43 AM IST

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 511 रुग्ण आढळून आले आहेत. तर 78 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 69 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत.

 मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई -कोरोनाचे आज नवे 1 हजार 511 रुग्ण आढळून आले असून 78 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 हजार 708 वर तर मृतांचा आकडा 4 हजार 629 वर पोहचला आहे. आतापार्यंत 44 हजार 791 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 29 हजार 288 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 511 रुग्ण आढळून आले आहेत. तर 78 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 69 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 78 मृत्यूपैकी 52 रुग्णांना दिर्घकालीन आजार होता. मृतांमध्ये 55 पुरुष आणि 21 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 5 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 38 जणांचे वय 60 वर्षावर तर 32 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. आज 621 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 44 हजार 791 वर पोहचला आहे.

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर पोहचला आहे. 24 ते 30 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.68 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 42 दिवस इतका आहे. सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 755 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभाग सिल करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 174 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही पूर्णच इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6 हजार 245 अति जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 13 हजार 826 अति जोखमीच्या संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 33 हजार 752 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details