महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू - मुंबई-अहमदाबाद महामार्ग बातमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी येथे कारचा भीषण अपघात
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी येथे कारचा भीषण अपघात

By

Published : Jun 26, 2020, 9:06 PM IST

Updated : Jun 26, 2020, 11:36 PM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील दापचरी येथे कारचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग

मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणारी वॅगनआर कार दुभाजकाला धडकून हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका 10 वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. श्रुती देवीप्रसाद शुक्ला (16), रैना देवीप्रसाद शुक्ला (42), स्वयं देवीप्रसाद शुक्ला (10), संजयकुमार विजय तिवारी (36) आणि देवीप्रसाद लालमनी शुक्ला अशी मृतांची नावे आहेत. ते नालासोपारा येथील रहिवासी आहेत.

Last Updated : Jun 26, 2020, 11:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details