महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; 35 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात 35 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 हजार 611 वर पोहचला आहे. सध्या नागपूरात रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 80 टक्के इतके आहे

नागपूर कोरोना अपडेट
नागपूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 3, 2020, 8:32 AM IST

नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात 35 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 हजार 611 वर पोहोचला आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना चाचणीपूर्वीच प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 12 रुग्ण हे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी आहेत. दरम्यान उपचारानंतर आज 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 290 इतकी झाली आहे. शिवाय, आतापर्यंत एकूण 25 कोरोना बधितांची मृत्यू झाला आहे.

सध्या नागपुरात 296 रुग्णांवर जिल्ह्यातील मेयो, मेडिकल, एम्स आणि लष्करी रुग्णालय कामठी येथे उपचार सुरू आहेत. सध्या नागपुरात रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 80 टक्के इतके आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details