महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्याने' रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न, पण... - ठाणे लेटेस्ट न्यूज

विनयकुमार हा शनिवारी (काल) दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत असताना त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर तो प्राणायू रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावर गेला आणि त्याने तेथून खाली उडाली मारली. मात्र तो मध्येच लटकला होता.

रुणाची आत्महत्येचा प्रयत्न
रुणाची आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Jun 20, 2021, 4:56 PM IST

Updated : Jun 20, 2021, 5:29 PM IST

ठाणे -खासगी रुग्णालयाच्या इमारतीवरून एका मद्यपीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याने उडी मारल्यानंतर सुदैवाने इमारतीच्या प्रवेशद्वारावरील छतावर पडल्याने तो बचावला. ही घटना भिवंडी कल्याण महामार्गावरील गोवे नाका येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या प्राणायू रुग्णालयाच्या इमारतीत घडली आहे. विनयकुमार कुशवाह (वय-२४ रा. पिंपळघर ) असे बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

छतावरून उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न
क्रेनच्या मदतीने उतरवले खाली

विनयकुमार हा शनिवारी (काल) दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत असताना त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर तो प्राणायू रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावर गेला आणि त्याने तेथून खाली उडाली मारली. मात्र तो मध्येच लटकला होता. त्यांनतर या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे चाळीस फूट उंचीवर अडकून पडलेल्या विनयकुमारला क्रेनच्या मदतीने खाली उतरवत त्याचे प्राण वाचविले.

पोलिसांनी केली घटनेची नोंद

मद्यपी विनयकुमारची इमारतीवरून उडी चुकल्याने व कमी उंचीवर पडल्याने त्यास किरकोळ दुखापत झाली. कुशवाह याला प्राणायू या खाजगी रुग्णालयात येथेच प्रथमोपचार केल्यानंतर कोनगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने पोलिसांनी कुशवाहचा जबाब नोंदवून त्याला समज देऊन सोडून दिले.

हेही वाचा -मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानाधारक दारू विक्रेत्यांना दिलासा

Last Updated : Jun 20, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details