ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आदिपुरुषमधील एका फोटोशी तुलना करत एका तरुणाने हा फोटो ट्विटरवर अपलोड केला. मुख्यमंत्र्यांची तुलना आदिपुरुषमधील फोटोसोबत केल्याने मोठी खळबळ उडाली. तरुणाच्या या ट्विटरवर ठाणे पोलिसांनी जबरदस्त दणका देत तरुणाला त्याचा नंबर मागितला असून त्याला ठाण्यात बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण :भगवान राम आणि रामायणावर आधारित आदिपुरुष या चित्रपटाची सध्या सगळीकडे धूम सुरू आहे. यामध्ये रावण आणि हनुमानाच्या भूमिकाही लक्षवेधक आहेत. मात्र ट्विटरवर अभय नावाच्या तरुणाने आदिपुरषमधील एका फोटोसोबत तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसोबत केली आहे. दोन्ही फोटो एकत्र करुन या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदिपुरुष या चित्रपटात होते, याबाबत माहिती नव्हते, असे कॅप्शन दिले आहे. मात्र या फोटोवरुन आता मोठा गदारोळ सुरू झाला आहे.