ठाणे- मद्यपान करण्यासाठी बारमध्ये बसलेल्या 29 वर्षीय तरुणाचा केवळ धक्का लागल्याने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. 9 एप्रिल) बदलापूर ( Badlapur ) शहरातील एका बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या ( CCTV ) आधारे दोघा संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धांत सरोज, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धक्कादायक ! बारमध्ये धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा खून - Alcoholism
मद्यपान करण्यासाठी बारमध्ये बसलेल्या 29 वर्षीय तरुणाचा केवळ धक्का लागल्याने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. 9 एप्रिल) बदलापूर शहरातील एका बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर ( Badlapur ) पश्चिम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे दोघा संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धांत सरोज, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
टोळक्याने केली लाठ्या काठ्यांनी जीवघेणी मारहाण -बदलापूर पश्चिम येथील हेंदरपाडा भागात नाईन सिज नावाचे बार अॅण्ड रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी शनिवारी (दि. 9 एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास मृत सिद्धांत आपल्या मित्रासोबत मद्यपान करण्यासाठी आला होता. त्यावेळी या बारमधील बाजूच्या टेबलवर चार ते पाच जण मद्यपान करत बसले असता यातील एकाचा मृत सिद्धांतला चुकून धक्का लागला. यामुळे बारमध्येच वाद होऊन एका आरोपीने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर मृत सिद्धांत बारमधून बाहेर पडताच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाठ्या काठ्यांनी जीवघेणी मारहाण केली. या मारहाणीत सिद्धांतला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. बदलापूर पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोन संशयित त्यांना ताब्यात घेतले आहे. तर सीसीटीव्हीच्या आधारे इतर आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
हेही वाचा -Thane Beauty Parlor Owner Murder : उसनवारीच्या वादातून माय-लेकाने केली महिलेची हत्या, एकाला अटक