ठाणे- जिल्ह्यात खड्डयांमुळे आणखी एकाचा बळी गेला आहे. शिळफाटा रोडवर हा अपघात झाला असून एका तरुणाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. असिम सिद्दीकी (वय 22, रा. मुंब्रा ) असे या तरुणाचे नाव आहे.
ठाण्यात खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; शिळफाटा रोडवर झाला अपघात - thane accident
शिळफाटा रोडवर हा अपघात झाला असून एका तरुणाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून कंटेनरसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास गाडीत पेट्रोल भरण्याकरिता बाहेर गेलेला असिम शिळफाटा रोडवरुन आपल्या घरी परतत होता. यावेळी असिमची गाडी रस्त्यावर पडलेल्या खड्डयात आदळून तो रस्त्यावर पडला आणि आणि मागून येणाऱ्या कंटेनरने असिमच्या गाडीला जोरात धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. असिमला जवळच्याच काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाला आणि कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, चालका सोबतच ज्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावर खड्डे पडले त्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी असिमच्या कुटुंबीयांनी केली आहे.