महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकलमध्ये स्टंट करणे पडले महागात, तरुणाचा मृत्यू - दिलशाद खान

चालत्या लोकल रेल्वेतून बाहेर लटकत स्टंट करताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

दिलशाद खान
दिलशाद खान

By

Published : Dec 30, 2019, 11:53 AM IST

Updated : Dec 30, 2019, 4:25 PM IST

ठाणे- कल्याणच्या 20 वर्षीय तरुणाचा लोकलमध्ये स्टंट करताना मृत्यू झाल्याची घटना घडली. तो रेल्वेबाहेर लटकत असताना खांबाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. दिलशाद खान (वय 20 वर्षे), असे त्याचे नाव असून 21 जानेवारीला त्याचा वाढदिवस आहे.

घटनेचे व्हिडीओ


दिलशाद हा गुरुवारी (दि. 26 डिसें) त्याच्या मित्रासोबत गोवंडीला भावाच्या लग्नासाठी कपडे घ्यायला जात होता. त्यावेळी दिवा आणि मुंब्राजवळ लोकलच्या बाहेर लटकून प्रवास करत होता. मात्र, अचानक एक खांब आला आणि त्याचा फटका दिलशादला बसला. त्यामुळे तो डब्यात कोसळला, हे सर्व त्याचा मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. त्यामुळे चूक दिलशादचीच असल्याचे स्पष्ट झाले.


दिलशाद नुकताच एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कामाला लागला होता. मात्र, स्वतःच्या चुकीने त्याने जीव गमावला असल्याची चर्चा परिसरात आहे. लोकलमध्ये स्टंट करताना आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. या अपघातात देखील दिलशाद स्टंट करताना त्यांच्या मित्राने त्याचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित केला आहे.

हेही वाचा - हप्तेखोर 'साहेबांच्या आशीर्वादा'मुळे खासगी बस चालकाची पोलीस कर्मचाऱ्यांशीच मुजोरी !

Last Updated : Dec 30, 2019, 4:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details