मीरा भाईंदर - काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यावेळी उपस्थित होते.
पुढच्या निवडणुकीत १० पेक्षा अधिक युवा नगरसेवक-
भाईंदर पश्चिमेच्या सेकंडरी शाळेमध्ये मीरा भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने युवासवांद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युवक अध्यक्ष दीप काकडे यांनी युवकांना संबोधित केले. शहरात अनेक समस्या आहेत. आपल्याला जनतेच्या घराघरात पोहचण गरजेचं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत पुढच्या निवडणुकीत १० पेक्षा अधिक युवा नगरसेवक असतील, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.