ठाणे- जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याने मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये बदल झाला नाही तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे वास्तव आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी मार्मिक संदेश देणाऱ्या एका गाण्याची निर्मिती ठाण्यातील काही युवकांनी केली आहे. त्यांनी हे पर्यावरणाविषयी मार्मिक संदेश देणारे 'रोयेगा तू ... मरेगा तू' हे गाणे बुधवारी युट्युबवर प्रदर्शित केले आहे.
रोयेगा तू, मरेगा तू...! पर्यावरण संवर्धनासाठी ठाण्यातील युवकांनी गाण्यातून दिला मार्मिक संदेश - संदेश
जागतिक पर्यावरण दिनी मार्मिक संदेश देणाऱ्या एका गाण्याची निर्मिती ठाण्यातील काही युवकांनी केली आहे. त्यांनी हे पर्यावरणाविषयी मार्मिक संदेश देणारे 'रोयेगा तू ... मरेगा तू' हे गाणे बुधवारी युट्युबवर प्रदर्शित केले आहे.
बोल बोल के थक गया है इंसान, धरती रो रही, रो रहा है आसमान.. क्यों फेंकता है तू कूडा कचरा, प्लास्टिक यूज कर संभालके जरा...अपनी ही धरती की मारने चला है साले क्यूं... रोएगा तू... मरेगा तू , अपनी करतूतों के सारे ... फल भुगतेगा तू ... असे या मार्मिक गाण्याचे बोल असून जगतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बी.वाय.एन या वेब मालिकेतील अभिनेते तुषार खैर आणि तरुण कवी आणि लेखक असणाऱ्या कौस्तुभ हिले यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.
या गाण्यातून यांनी लोकांची कचरा फेकण्याच्या सवयीवर भाष्य करत संपूर्ण समाजाला 'रोयेगा तू, मरेगा तू' अस म्हणत धोक्याची सूचना दिली आहे. या गाण्याचा व्हिडिओसुद्धा वेगळ्या पद्धतीने चित्रित करण्यात आला असून त्याचे दिग्दर्शन हर्षद समर्थ याने केले आहे. तर चित्रीकरण कल्पेश कदम आणि भावेश समर्थ यांनी केले आहे. संकलन भावेशच असून गाण्यात आवाज तुषार आणि कौस्तुभचा आहे. चटकन लक्षात राहणारी चाल, आणि आजच्या तरुणाईच्या भाषेत हे गाणे लिहिले आहे. या गाण्याचे चित्रीकरण ठाणे आणि डोंबिवलीमध्ये करण्यात आले आहे.