महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेयसी, पेन ड्राईव्ह अन् 'ते' व्हिडीओ...ब्रेकअपच्या बदल्यासाठी खतरनाक खेळ - money extortion case bhiwandi

खंडणीसाठी परमेशने फेसबुकवर मित्र झालेल्या एका पाकिस्तानी तरुणाची मदत घेतली होती. त्याच्या व्हॉट्सअ‌ॅप नंबरवरून परमेशने त्या तरुणीला आणि तिच्या नातेवाईकांना व्हिडिओ आणि फोटो पाठवले होते. कोर्टाने परमेशला १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आता पुन्हा त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

parmesh bhairy extortion case
वर्तकनगर पोलीस ठाणे

By

Published : May 11, 2020, 8:07 PM IST

Updated : May 11, 2020, 8:30 PM IST

ठाणे- भिवंडीत राहणाऱ्या एका तरुणाला आपल्या ब्रेकअप झालेल्या प्रेयसीकडून खाजगी प्रेम संबंधाचे व्हिडिओ दाखवून पैसे उकळणे चांगलेच महागात पडले आहे. तरुणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या तरुणाच्या मुसक्या आवळल्या असून त्याला १४ दिवसांसाठी तुरुंगात डांबण्यात आले आहे.

परमेश भैरी (वय.२८) असे या तरुणाचे नाव आहे. शहरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध होते. कालांतराने त्यांच्यामध्ये वितुष्ट आल्याने त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र, काही दिवसांपूर्वी या तरुणीला आणि तिच्या काही नातेवाईकांना व्हॉट्सअ‌ॅपवर एका परदेशी नंबरवरून काही फोटो आणि व्हिडिओ क्लिप आल्या. हे फोटो आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी परमेशने तरुणीला दिली. त्याचबरोबर, परमेशने तरुणीला एक लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत तरुणीने वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा वर्तक नगर पोलीस ठाण्यातर्फे तपास होत असतानाच ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने परमेशला भिवंडी येथून अटक केली. दरम्यान, हा सर्व प्रकार आपणच केला असल्याचे परमेशने कबूल केले आहे.

खंडणीसाठी परमेशने फेसबुकवर मित्र झालेल्या एका पाकिस्तानी तरुणाची मदत घेतली होती. त्याच्या व्हॉट्सअ‌ॅप नंबरवरून परमेशने त्या तरुणीला आणि तिच्या नातेवाईकांना व्हिडिओ आणि फोटो पाठवले होते. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने परमेशला वर्तक नगर पोलीस ठाणाच्या ताब्यात दिले. त्यानंतर कोर्टाने त्याला १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आता पुन्हा त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा-खाकीतील माणुसकीचे दर्शन; परराज्यात पायी जाणाऱ्यांना फुकट बस प्रवास

Last Updated : May 11, 2020, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details