ठाणे- शाळकरी मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना भिवंडीतील हंडी कंपाऊंड येथे घडली. या प्रकरणी नराधमाच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नराधमास गजाआड करण्यात आले आहे.
अर्सलान अली अहमद अन्सारी (वय 19 वर्षे, रा. हंडी कंपाउंड) असे नराधमाचे नाव आहे. त्याने सुभाष नगर, कारिवली येथील ओळख असलेल्या 4 थीत शिकणाऱ्या 9 वर्षीय शाळकरी मुलाला माती भरण्यासाठी मदत कर, असे खोटे सांगितले. त्यानंतर त्याला हंडी कंपाऊंड येथील खलदून इमारतीच्या बाजूला नेवून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्यावर अमानूष अत्याचार केला.