ठाणे - स्वच्छतेचे काम करीत असताना मैल सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. परंतु काम करणारे कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक सुरक्षेसह काम करतांना दिसत नाही. किंबहुना त्यांना सुरक्षित साधनांचा पुरवठा करण्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे असुरक्षितता आणि योग्य मार्गदर्शन नसल्याने मैल सफाई कामगार अथवा ड्रेनेजमध्ये काम करताना गुदमरून मृत्यू पावल्याच्या अनेक घटना घडत असतात. या घटना रोखण्यासाठी कामगारांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे.
भिवंडीत मनपा मैल सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार सफाईचे शास्त्रोक्त प्रशिक्षण
पुणे येथील कॅम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून भिवंडी महानगरपालिकेतील २०० मैल सफाई कर्मचारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. शिबिराचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्य स्वच्छता आरोग्य अधिकारी अशोक संख्ये, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे, कॅम फाऊंडेशनच्या प्रमुख डॉ स्मिता सिंग आणि मुख्य सल्लागार एम. कृष्णा उपस्थित होते.
पुणे येथील कॅम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून भिवंडी महानगरपालिकेतील २०० मैल सफाई कर्मचारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. शिबिराचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्य स्वच्छता आरोग्य अधिकारी अशोक संख्ये, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे, कॅम फाऊंडेशनच्या प्रमुख डॉ स्मिता सिंग आणि मुख्य सल्लागार एम. कृष्णा उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भिवंडी महानगरपालिकेस राष्ट्रीय पातळीवर २६ वे तर महाराष्ट्र पातळीवर ७ व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले. महानगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेमुळे हे शक्य झाले. सफाई कामगार आपले काम करीत असताना स्वतःची व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या प्रशिक्षणाची गरज आहे.
प्रशिक्षणासाठी पुणे येथील कॅम फाऊंडेशनचे विनामूल्य सहकार्य मिळणार आहे. शौचालय आणि स्वच्छता हे समाजाकडून दुर्लक्षित असलेले काम जरी असले तरी त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने १९ नोव्हेंबर हा 'शौचालय दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे त्याचे महत्व मोठे आहे. त्यासाठी प्रत्येकाने शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन योग्य ती उपकरणे वापरणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया कॅम कंपनीचे सल्लागार एम. कृष्ण यांनी दिली. या प्रशिक्षण शिबिरात ३५ कर्मचाऱ्यांची एक तुकडी करून २०० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये त्यांच्या कामाचे मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती कॅम फाऊंडेशनच्या प्रमुख डॉ स्मिता सिंग यांनी दिली.