महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र, राज्य सरकार विरोधात कामगार संघटना एकवटल्या - कामगार संघटना

राज्य आणि केंद्र सरकारच्या आर्थिक निर्णयांवर आक्षेप घेत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने ठाण्यात केले आहे.

कामगार संघटनांचा मेळावा

By

Published : Apr 12, 2019, 12:10 AM IST

ठाणे - महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेना उमेदवारांचा पराभव करावा आणि लोकशाही मूल्यांना मानणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने केले आहे.

कामगार संघटनांचा मेळावा

सार्वजनिक क्षेत्राची विक्री खासगी उद्योगपतींना करणे, राष्ट्रीय संपत्तीचे मोजक्या भांडवलदार मित्रांना वितरण करणे. राफेल प्रकरणातील सरकारची भूमिका, कामगार आणि शेतकऱ्यांच्या ठेवीतून विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी सारख्या ७००० कर्जबुडव्या उदयोगपतींना कर्ज देऊन परतफेड न करता, त्यांना देशाबाहेर पलायन करण्यासाठी सरकारी यंत्रनांनी मदत केल्याचा आरोप या संघटनाच्या वतीने करण्यात आला. या वेळी 'अब की बार भाजप सरकार हद्दपार' अशी घोषणाही देण्यात आली. याअनुषंगाने ठाण्यात झालेल्या बैठकीत इंटक, हिंदू मजदूर सभा, एनटीयूआय या कामगार संघटनांच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details