महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची लिफ्ट तुटून एका कामगाराचा मृत्यू - lift

मृत गुलबहार हा लिफ्टमधून सुताचा भरलेला बीम घेऊन पहिल्या माळ्यावरून मंगळवारी सांयकाळच्या सुमारास खाली उतरत होता. त्यावेळी लिफ्टचे ब्रेक फेल झाल्याने वेगाने लिफ्ट खाली कोसळली.

प्रातिनिधिक छायाचित्र

By

Published : Apr 25, 2019, 1:51 AM IST

ठाणे - दुमजली यंत्रमाग कारखान्याची लिफ्ट तुटून अपघात झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडीतील सुभाष नगर भागातील एका यंत्रमाग कारखान्यात घडली. गुलबहार मंगरू खान (३४) असे लिफ्टच्या अपघातात जागीच ठार झालेल्या यंत्रमाग मजुराचे नाव आहे.

मृत गुलबहार हा लिफ्टमधून सुताचा भरलेला बीम घेऊन पहिल्या माळ्यावरून मंगळवारी सांयकाळच्या सुमारास खाली उतरत होता. त्यावेळी लिफ्टचे ब्रेक फेल झाल्याने वेगाने लिफ्ट खाली कोसळली. यात मजूर गुलबहार याच्या पोटावर गंभीर जखम होऊन त्याचे आतडे बाहेर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सागर मालदे व पारस मालदेंच्या मालकीच्या असलेल्या या दुमजली कारखान्यात साहित्याची ने-आण करण्यासाठी लिफ्ट बसविण्यात आलेली आहे. मात्र लिफ्टच्या देखभालीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या अपघाती मृत्यूची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात असून पोलीस तपासात यंत्रमाग कारखाना मालकांचा दोष आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एपीआय संतोष बोराटेंनी दिली.


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details