ठाणे- सेलमध्ये १० रूपयाची साडी खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी लपास केली. पर्स बरोबर त्यामधील १० हजार रुपयेसुद्धा चोरीला गेले. पर्स चोरी गेलेल्या महिलेचे नाव प्रेरणा दिनेश भाटिया असे आहे.
उल्हासनगर मधील एका दुकानावर अवघ्या दहा रुपयांमध्ये साडी मिळत होती. साडी घेण्यासाठी येथे महिलांची प्रचंड गर्दी जमली. याच गर्दीचा फायदा घेत प्रेरणा यांची पर्स चोरट्यांनी लपास केली. या दुकानावर साडी खरेदी करण्यासाठी प्रेरणा आपल्या मैत्रिणीबरोबर सकाळी १० वाजल्यापासून रांगेत उभ्या होत्या. त्याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पैशांची पर्स चोरी केली.