ठाणे -एका ३० वर्षीय विवाहितेचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर पत्री पुलाजवळील निर्जनस्थळी कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन विविध कलमांसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. साईनाथ तारे असे आरोपी शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला दोन वर्षांपूर्वी आरोपी साईनाथने व्यवसायात भागीदार राहण्यासाठी एका मॉलमध्ये बोलावले होते. मात्र, त्यावेळी पीडितेने भागीदारी व्यवसायास नकार दिल्याने आरोपीने पीडितेवर अश्लील शेरेबाजी केली. त्यांनतर पीडितेच्या फेसबुक व व्हॉट्सअॅपवर आरोपीने अश्लील फोटो व मॅसेज पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीसोबत त्याच्या कारमध्ये गेली असता, त्याने पुन्हा तिच्यासोबत अश्लील चाळे करून फोटो काढले व पुन्हा फोटो व्हायरल करणार असल्याची धमकी देत, पीडितेवर बलात्कार केला.