ठाणे- इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर तरुणीचा अश्लील फोटो टाकून बदनामी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या भावाने बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात भोईवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्रामवर तरुणीची बदनामी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Instagram
अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन तरुणीचे अश्लील छायाचित्र प्रकाशित केले व तिची बदनामी केली आहे. हे घृणास्पद कृत्य पीडित तरुणीच्या भावाला समजताच त्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
सोशल मीडिया
भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीचे अश्लील छायाचित्र एका अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन प्रकाशित केले व तिची बदनामी केली आहे. हे घृणास्पद कृत्य पीडित तरुणीच्या भावाला समजताच त्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोईवाडा पोलीस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.