महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime News : उल्हासनगरमध्ये अज्ञाताकडून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक

भररस्त्यात एका महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली ( Attack On Woman In Ulhasnagar ) आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली ( Woman Seriously Injured In Ulhasnagar ) आहे.

Crime News
Crime News

By

Published : Feb 28, 2022, 8:01 PM IST

ठाणे - भररस्त्यात एका महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली ( Attack On Woman In Ulhasnagar ) आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली ( Woman Seriously Injured In Ulhasnagar ) आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात ( Hill Line Police Station ) अज्ञाताविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जखमी महिलेचा फुलांचा व्यवसाय

रमा कांबळे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. रमा कांबळे यांचे उल्हासनगर कॅम्प नंबर ५ भागातील साई वसण शाह दरबार शेजारी हार फुलांचा व्यवसाय आहे. आज ( सोमवार ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हार फुल विक्रीच्या निमित्ताने साई वसण शाह दरबार समोरील रस्त्याने जात असताना एका हल्लेखोराने रमा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात रमा यांच्या डोक्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यांना सुरूवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

आरोपी फरार

घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. त्यानंतर कळवा येथील रुग्णालयात जात जखमी महिलेचा जबाब नोंदवून हल्लेखोरा विरोधात आज ( सोमवार ) सायंकाळच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. परंतु, दिवसाढवळ्या भररस्त्यात धारदार शस्त्राने महिलेवर हल्ला झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा -Marathi Youth Accident : वर्ध्यातील 3 तरुणांचा मध्य प्रदेशात अपघाती मृत्यू, जात होते महादेवाच्या दर्शनासाठी

ABOUT THE AUTHOR

...view details