ठाणे- घरगुती वादातून झालेल्या भांडणात राग अनावर झाल्याने पतीने पत्नीचा ब्लँकेटने गळा आवळून उशीने तोंड दाबत खून केल्याची घटना घडली होती. यानतंर आरोपी अरविंद केशरवानी (वय 27) फरार झाला होता. आता आरोपी पतीला भिवंडीतील काल्हेर गावातून पोलिसांनी अवघ्या ३६ तासातच अटक केली आहे.
पत्नीचा खून करुन फरार झालेला आरोपी गजाआड, पोलिसांनी ३६ तासात लावला छडा - पत्नीचा खून करुन फरार झालेला आरोपी गजाआड
घरगुती वादातून झालेल्या भांडणात राग अनावर झाल्याने पतीने पत्नीचा ब्लँकेटने गळा आवळून उशीने तोंड दाबत खून केल्याची घटना घडली होती. यानतंर आरोपी अरविंद केशरवानी (वय 27) फरार झाला होता. आता आरोपी पतीला भिवंडीतील काल्हेर गावातून पोलिसांनी अवघ्या ३६ तासातच अटक केली आहे.
भिवंडी शहरातील पदमानगर - श्रीरंगनगर परिसरात आरोपी अरविंद हा पत्नी व दोन मुलांसह एका इमारतीमध्ये राहात होता. पाच वर्षांपूर्वी त्याचा सपनाशी विवाह झाला होता. काही महिन्यापासून घरगुती वादातून दोघांमध्ये खटके उडत होते. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले. त्यावेळी राग अनावर झाल्याने त्याने पत्नी सपनाच्या गळ्याभोवती ब्लँकेट आवळून तिचा खून केला. त्यांनतर आरोपी अरविंदने घडलेला प्रकार आपल्या एका नातेवाईकाला फोन सांगून मीही आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यानंतर नातेवाईकाने पोलिसांना ही माहिती दिली.
माहितीच्या आधारे भिवंडी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान, गुप्त माहितीदाराने आरोपी भिवंडीतील काल्हेर गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून त्याच्यावर झडप घालून अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी दिली आहे.