महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून विधवा महिलेवर कारखान्यात घुसून कैचीने वार; घटना सीसीटीव्हीत कैद ... - उल्हासनगर प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून विधवा महिलेवर हल्ला

पीडित विधवा उल्हासनगरमध्ये राहते. तर आरोपी दयानंद हा उल्हासनगर ४ नंबर मधील अशाळेपाडा भागात राहतो. आरोपी दयानंदचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणावरून आरोपीशी पीडितेने प्रेमसंबंध तोडले होते. त्यानंतरही आरोपीने पीडितेला संबध ठेवण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, पीडितेने त्याला नकार दिल्याने वाद झाला. याच वादातून पीडित महिला कारखान्यात मशीनवर गाऊन शिवत असतानाच, सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आरोपी दयानंद कारखान्यात घुसून कैचीने पीडितेच्या पाठीवर वार केले.

widow was attacked with scissors after breaking into a love affair in ulhhasnagar at thane
प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून विधवा महिलेवर कारखान्यात घुसून कैचीने वार

By

Published : May 18, 2022, 3:26 PM IST

Updated : May 18, 2022, 4:35 PM IST

ठाणे - प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून कारखान्यात घुसून एका ३६ वर्षीय विधवा महिलेवर तिच्या प्रियकराने कैचीने वार केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना उल्हासनगर मधील कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केट परिसरात असलेल्या रेडिमेड कपडे शिवण्याच्या कारखान्यात घडली आहे. घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर प्रियकरावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. दयानंद फुगारे (वय,३६) असे आरोपीचे नाव आहे.

प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून विधवा महिलेवर कारखान्यात घुसून कैचीने वार
पाठीवर कैचीने वार करून आरोपी फरार -३६ वर्षीय पीडित विधवा उल्हासनगरमध्ये राहते. तर आरोपी दयानंद हा उल्हासनगर ४ नंबर मधील अशाळेपाडा भागात राहतो. आरोपी दयानंदचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणावरून आरोपीशी पीडितेने प्रेमसंबंध तोडले होते. त्यानंतरही आरोपीने पीडितेला संबध ठेवण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, पीडितेने त्याला नकार दिल्याने वाद झाला. याच वादातून पीडित महिला कारखान्यात मशीनवर गाऊन शिवत असतानाच, सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आरोपी दयानंद कारखान्यात घुसून कैचीने पीडितेच्या पाठीवर वार केले. या हल्ल्यात पीडित महिला जखमी होऊन खाली पडली. त्यावेळी काही कामगारांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. विशेष म्हणजे कामगारांनी हल्लेखोराला पडकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्या तावडीतून निसटून फरार झाला. आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना - याबाबात हिल लाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्रे याच्याशी संपर्क साधला असता, "दोघेही एकमेकांना ओळखत असून पीडित महिला विधवा आहे. आरोपीसोबत तिचे पूर्वी प्रेमसंबंध होते. महिलेच्या पाठीवर किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर दुसरीकडे आरोपीला अटक करण्यासाठी एक पोलीस पथक रवाना केले असून तयार केली आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
Last Updated : May 18, 2022, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details