ठाणे- भिवंडी शहरात आज शुक्रवार (दि. 20 डिसें) सकाळी 9 वाजल्यापासून ते उद्या शनिवारी (दि. 21 डिसें) सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वारपरण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले.
भिवंडी शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्रीब्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. (स्टेम) तर्फे ठाणे महानगरपालिका एकत्र असलेल्या जलवाहिन्यांच्या साकेत येथील प्लेट बदली करून नवीन प्लेट टाकण्याच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे.
हेही वाचा - भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी निघाली 'सौ. ४२०', पाच वर्षांत सात जणांना लाखोंचा गंडा
स्टेम कंपनीमार्फत भिवंडी शहराला होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांना पुढील एक दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. यामुळे सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
हेही वाचा - ऐन लग्न समारंभात किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत