महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात मतदानाचा टक्का घसरला; युतीसह आघाडीलाही विजयाबद्दल शाश्वती नाही - thane

ठाणे लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर आघाडीच्या वतीने आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

युतीसह आघाडीलाही विजयाबद्दल शाश्वती नाही

By

Published : Apr 30, 2019, 8:08 PM IST

ठाणे- निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला नाही. कमी झालेल्या मतदानाचा फटका किंवा फायदा कोणाला होणार हे येत्या २३ मे रोजी स्पष्ट होईल. मात्र, असे असले तरी कमी झालेले मतदान आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना विचार करायला लावणारे आहे.

मतदान कमी होण्यामागे मतदान प्रक्रियेमधील काही प्रमाणात झालेला तांत्रिक बिघाड आणि उन्हाचा तडाखा ही कारणे आहेत. शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जाणारे कोपरी पाचपाखाडी, आणि ठाणे या दोन विधासभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले आहे. त्यामुळे मोदींच्या नावावर मते मागूनही अपेक्षित मते मिळाली नसल्याने मोदी लाट यावेळी नव्हती हे उघड झाले आहे. दुसरीकडे भाजपच्या ताब्यात असलेल्या मीरा-भाईंदर आणि बेलापूर मतदार संघातही मतदान वाढलेले नाही. कमी मतदान हा सरकार विरोधातील रोष असावा असे मानले तरी मतदारांनी जास्त प्रमाणात मतदान करून सरकार विरोधातील हा रोष दाखवणे आवश्यक होते. तसे न झाल्याने निवडणून येणारा उमेदवार हा फार कमी फरकाने निवडणून येणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. ठाण्यात यंदा ४९.२३ एवढे मतदान झाले आहे. २०१४ मध्ये ५३.३४ एवढे मतदान झाले होते. तेव्हा विचारे यांचा २ लाख ८८ हजार मतांनी विजय झाला होता.

ठाण्यात मतदानाचा टक्का घसरला

ठाणे लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर आघाडीच्या वतीने आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आजी आणि माजी पालकमंत्री असलेले आमदार एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आघाडीच्या वतीने मांडण्यात आलेला शिक्षणाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीमध्ये चांगलाच गाजला. विशेष म्हणजे प्रचारामध्येही आनंद परांजपे यांनी आघाडी घेतली असल्याची चर्चा होती. २०१४ च्या निवडणुकीमध्ये मोदी लाट असल्याने डॉ. संजीव नाईक यांच्या विरोधात राजन विचारे यांना जवळपास ३ लाखांचा लीड होता. मात्र, या निवडणुकीमध्ये तसे वातावरण पाहायला मिळाले नाही. त्यामुळेच ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढलेले नाही.

कोपरी-पाचपाखाडी या मतदार संघातून स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मतदारसंघात गेल्या निवडणुकीमध्ये ५३.१२ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळी केवळ ४८.५७ टक्के मतदान झाले आहे. ठाणे मतदार संघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. या ठिकाणी आमदार संजय केळकर नेतृत्व करत असून विशेष म्हणजे या ठिकाणी भाजपचे आमदार संजय केळकर नेतृत करत आहेत. २०१४ ला या ठिकाणी ५६.५८ टक्के मतदान झाले. तर, यावेळी केवळ ४८.६२ टक्के मतदान झाले आहे. याचाच अर्थ भाजपने देखील म्हणावे तसे काम या मतदार संघात केलेले नाही. तर दुसरीकडे केवळ एकच ऐरोली मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असून या मतदार संघात मात्र टक्केवारीमध्ये फारसा फरक पडला नसल्याने निवडणून येणारा उमेवार फार कमी फरकाने निवडणून येणार आहे.


ठाणे लोकसभा मतदार संघात झालेले एकूण मतदान खालीलप्रमाणे -

१४६ ओवळा-माजीवाडा विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदान - २०८२२६ (४७.५२%)
पुरुष - ११६५६२
स्त्री - ९१६६२
इतर - ०२
१४७ कोपरी-पाचपखाडी विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदान - १७७९७५ (५१.१५%)
पुरुष - १०११७१
स्त्री - ७७८००
इतर - ०४
१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदान - १९१७२६ (५७.९%)
पुरुष - १०३२७५
स्त्री - ८८४५१
इतर - ०

ABOUT THE AUTHOR

...view details