ठाणे - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी विशेष मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. या २ दिवसात सुमारे १५ हजार नवीन नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली.
विशेष म्हणजे १८ आणि १९ वयोगटातील १३,१३६ अर्ज स्वीकारण्यात आले. बेलापूर येथे सर्वाधिक म्हणजे २११२ अर्ज घेण्यात आले. तर मुंब्रा कळवा येथे सर्वात कमी म्हणजे ३८३ अर्ज आले. गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत १० हजार नवीन नाव नोंदणीसाठी अर्ज आले होते. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदार नोंदणीपासून वंचित नागरिकांना आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
सर्व अर्ज उपलब्ध