ठाणे- मुंबई-नाशिक महामार्गावरील अर्जुनली पडघा येथील टोलनाक्यावर २ वाहन चालक आणि टोलनाका कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली.
मुंबई-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल - ठाणे
टोलनाक्यावर २ वाहन चालकांमध्ये वाद सुरू होता. तो वाद सोडवण्यासाठी गेलेल्या टोलनाका कर्मचाऱ्यास त्या वाहनचालकांनी मारहाण केली. त्यामुळे संतप्त टोलनाका कर्मचाऱ्यांनी या वाहनचालकांना बेदम मारहाण केली आहे.
वाहनचालक आणि टोल नाका कर्मचाऱ्यातील हाणामारी
टोलनाक्यावर २ वाहन चालकांमध्ये वाद सुरू होता. तो वाद सोडवण्यासाठी गेलेल्या टोलनाका कर्मचाऱ्यास त्या वाहनचालकांनी मारहाण केली. त्यामुळे संतप्त टोलनाका कर्मचाऱ्यांनी या वाहनचालकांना बेदम मारहाण केली आहे. यावेळी एका प्रवाशाने मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हायरल केल्याने ही घटना झाली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती आहे.