महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 26, 2020, 7:31 AM IST

Updated : Feb 26, 2020, 7:41 AM IST

ETV Bharat / state

'सातत्याने निष्ठा बदलणे, सत्तेच्या मागे जाणे म्हणजे गणेश नाईकांची मजबुती नव्हे'

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत गणेश नाईकांचा मजबूत असलेला बालेकिल्ला हिसकावून घेणं तितक सोप्प आहे का? या प्रश्नावर गणेश नाईकांचा रोज एक-एक बुरूज ढासळत आहे. सातत्याने निष्ठा बदलणे सत्तेच्या मागे जाणे याला मजबुती म्हणता येत नाही, अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी नाईक यांच्यावर केली.

विजय वड्डेटीवार
विजय वड्डेटीवार

नवी मुंबई -गणेश नाईकांचा रोज एक-एक बुरूज ढासळत आहे. आम्ही मजबुतीने नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाऊ, असे राज्याचे माजी विधानसभा विरोधी पक्षनेते, मदत-पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केले.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबात बोलताना मदत-पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार

नवी मुंबईतील नेरूळ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी विधानसभा विरोधी पक्षनेते आणि मदत-पुर्नवसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॉंग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांच्या करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संतोष शेट्टी, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांच्यासह काँग्रेसचे विविध नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -खासदार ओवैसींच्या सभेवरून भिवंडीत भाजप-एमआयएम आमने-सामने

यावेळी नवी मुंबई निवडणुकीत गणेश नाईकांचा मजबूत असलेला बालेकिल्ला हिसकावून घेणं तितक सोप्प आहे का? या प्रश्नावर गणेश नाईकांचा रोज एक-एक बुरूज ढासळत आहे. सातत्याने निष्ठा बदलणे सत्तेच्या मागे जाणे याला मजबुती म्हणता येत नाही, अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी गणेश नाईक यांच्यावर केली. तसेच काँग्रेस पक्ष नवी मुंबई महानगरपालिका ताकतीनिशी लढेल. सत्ता नसल्याने काँग्रेस पक्षात थोडीशी अनास्था व शिथिलता होती. मात्र, यावेळी मजबुतीने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. निवडणूक होईपर्यंत काँग्रेसचे नेते किंवा मंत्री नवी मुंबईत येतील व लोकांशी संपर्क साधतील, आम्ही सगळे ताकतीने या निवडणुकीला सामोरे जाऊ असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. महाआघाडीच्या सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. पक्षाच्या ताकतीनुसार वाटाघाटी होतील असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा -नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 शिवसैनिक भाजपमध्ये

Last Updated : Feb 26, 2020, 7:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details