महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बलात्कार प्रकरणी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते चौगुलेंसह एकाची निर्दोष मुक्तता - vijay chougule

नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह एकावर 2014 ला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

thane court
नवी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते चौगुलेंसह एकाची बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये निर्दोष मुक्तता

By

Published : Mar 13, 2020, 8:24 PM IST

नवी मुंबई - महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह अन्य एकाची ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्यावर 2014 ला सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम.पटवर्धन यांनी हा निर्णय दिला आहे.

हेही वाचा -अमरावतीत रक्तरंजित धुळवड, भरदुपारी तरुणाची हत्या

पीडित महिलेने नवी मुंबई गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीनुसार, सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये 2014 ला चौगुले आणि तसेच पीडीत महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी तानाजी सुर्वेंवर बलात्काराचा गुन्हा दाखला झाला होता. 2008 पासून अत्याचार केले असल्याचे पीडितेने तक्रारीमध्ये म्हटले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details