ठाणे :केंद्रात त्यांची सत्ता असल्याने राज्यात हे असंविधानिक सरकार टिकून आहे असं देखील चव्हाण म्हणाल्या. तसेच भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक असून भाजपाचा भगवा (BJP saffron) हा भोगाचे प्रतीक असल्याचे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महिला विद्या चव्हाण (Vidya Chavan controversial statement ) यांनी केले आहे. जलेबी बाबाने १२० महिलांवर धर्माच्या नावाने अत्याचार केल्याचे समोर आले. यामध्ये अल्पवयीन मुलीचा देखील पीडितमध्ये समावेश असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रनिमित्त विद्या चव्हाण (Vidya Chavan) या कल्याणमध्ये आल्या होत्या.
Vidya Chavhan Statment : भाजपाचा भगवा भोगाचे प्रतीक; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य - BJP saffron
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य (Vidya Chavan controversial statement) केले आहे. त्या म्हणाल्या की, भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक असून भाजपाचा भगवा (BJP saffron) हा भोगाचे प्रतीक आहे. तसेच केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे राज्यात हे असंविधानिक सरकार टिकून असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्यातील सत्ता संघर्षावर 'तारीख पे तारीख' : राज्यातील सत्ता संघर्षावर चव्हाण यांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात न्यायालय दबावाखाली असल्याने तारीख पे तारीख पडत आहे, असे जनतेचे म्हणणं असल्याचं मत व्यक्त करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी थेट न्यायालयाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे.
खासदार कोल्हेंवर अप्रत्यक्ष टीका : राष्ट्रवादीच्या बैठकीला खासदार अमोल कोल्हे गैरहजर असताना ते भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता अमोल कोल्हेवर राष्ट्रवादीकडून टीका करायला सुरुवात झाली. महागाई आणि बेरोजगारीवर खासदार अमोल कोल्हे सभागृहात कधी प्रश्न मांडणार असा प्रश्न त्यांना विचारा मला आनंद होईल, असे म्हणत राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण भाजपच्या वाटेवर असलेल्या खासदार कोल्हे यांना टोला लगावला आहे.