नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात एक ते दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात तीन हजार रुपये विक्रमी वाढ झाली. तब्बल १२ हजार रुपये किंमतीला १०० किलो शेवग्याच्या शेंगा विकल्या जात आहे. भेंडीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली असून इतरभाज्यांचे दरस्थिर (Vegetables Rates in APMC Market) आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates) :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५८०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४००० रुपये ते ४५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४२०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९३०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये