महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime News : तृतीयपंथीवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना अटक - ठाणे क्राईम

ठाणे जिल्ह्यात (Thane Crime) एका तृतीयपंथींवर दोन नराधमांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture Of Third Gender Thane) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांवर अनैसर्गिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल (Case filed in unnatural torture Thane) करण्यात आला आहे. आरोपींंनी तृतीयपंथीला मारहाण केल्याचेही माहितीतून पुढे आले. विशेष म्हणजे दोन्ही नराधमांना २४ तासाच्या आतच भिवंडी शहरातून अटक (unnatural torture case accused arrested) केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदूलकर यांनी दिली आहे.

Unnatural Torture Of Third Gender Thane
तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार

By

Published : Jan 8, 2023, 8:07 PM IST

अत्याचाराविषयी सांगताना पीडित

ठाणे : एका खोलीत नेऊन बेदम मारहाण करत दोघा नराधमांनी १९ वर्षीय तृतीयपंथीवर आळीपाळीने सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना भिवंडी शहरातील आजदनगर परिसरात असलेल्या एका खोलीत घडली होती. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांवर अनैसर्गिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तहाल सलीम खान (वय २३) आणि शाहिद (वय २५) असे अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत. विशेष म्हणजे नराधमांना तातडीने अटकेच्या मागणीसाठी तृतीयपंथी संघटनांनी इशारा दिला होता.

अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार :१९ वर्षीय पीडित तृतीयपंथी भिवंडीत राहते, तर दोन्ही नराधमही त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होती. त्यातच ६ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित तृतीयपंथी घरानजीक असलेल्या किराणा दुकानात दूध, अंडी पाव , आण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी परिसरात राहणाऱ्या दोघा नराधमाने दारू पिण्यासाठी पीडितला आग्रह केला. मात्र त्याला नकार दिला. त्यानंतर नराधमाने तुझ्याकडे आमचे काम आहे. तुझ्याही काही बोलायचे आहे. असे बोलून पीडितला नराधम शहीद याने त्याच्या खोलीत घेऊन आला. त्यानंतर खोलीचा आतून दरवाजा बंद करून पुन्हा पीडितला दारू पिण्यास आग्रह केला. मात्र पीडितने नकार देताच दोन्ही नराधमांनी बेदम मारहाण करून पीडित तृतीयपंथ्यावर बळजबरीने तीन ते चार तास अळीपाळीने अनसैर्गिक अत्याचार केले.


नराधमांना २४ तासांच्या आतच अटक :अनसैर्गिक अत्याचार केल्यानंतर आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास पीडितला खोली बाहेर काढले. आणि घडलेल्या प्रकाराची कुठेही वाचता केली तर ठार मारण्याची नराधमांनी धमकी दिली. त्यानंतर पीडित बेदम मारहाण आणि अनसैर्गिक अत्याचाराचा त्रास असाह्य झाल्याने पीडितने घडलेला प्रसंग घरच्यांना व गुरुला सांगितला. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पीडितने पोलिसांसमोर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच दोन्ही नराधमांविरोधात, भादंवि कलम ३७७, ३२४, ३४२, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरु केला असता एका नारधामला काही तसाच अटक केली. तर दुसऱ्याला आज सकाळच्या सुमारास अटक केली. विशेष म्हणजे दोन्ही नराधमांना २४ तासाच्या आतच भिवंडी शहरातून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदूलकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details