महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray Criticizes Modi over Manipur : माता-भगिनींची इज्जत लुटली जात असताना सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत-उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray Criticizes Modi

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर मणिपूरमधील हिंसाराचारवरून ठाण्यात जोरदार टीका केली. त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी बोलत होते.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : Jul 30, 2023, 9:28 AM IST

Updated : Jul 30, 2023, 1:03 PM IST

हिंदी भाषिक मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत

ठाणे: देश कोणत्याही एका व्यक्तीचा असू शकत नाही. आम्हाला विकास हवा आहे, मात्र देशाला गुलाम करणारा विकास आम्हाला नको. 2024ला जर बदल केला नाही, तर देश नालायक लोकांच्या हातात जाईल, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. भारत मातेला स्वतंत्र ठेवण्याची शपथ घेऊया, असे आवाहनही ठाकरेंनी हिंदी भाषिकांना केले. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हिंदी भाषिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.

ठाकरेंची ठणठणीत टीका: मेळाव्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या हिंदुत्वावरही सडकून टीका केली. याशिवाय त्यांनी राष्ट्रपती मुर्म यांच्यावरही टीका केली. माता-भगिनींची इज्जत लुटली जात आहे, मात्र हे सरकार धुर्तराष्टाच्या भूमिकेत आहे. देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी महिला आहेत. परंतु त्यांना मणिपूरच्या घटनेबाबत संवेदनशीलता नाही, असे टीकास्त्रही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर ठाकरेंनी सोडले.

उद्धव ठाकरेंची हिंदुत्ववर टीका: हिंदुत्ववर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे एकमेकांमध्ये भेद करतात त्याला हिंदुत्व म्हणत नाही. परंतु काही लोक हेच काम करत आहेत. हिंदुत्वाची व्याख्या काय? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा युतीचा मुद्दा समोर आणला. आमच्याकडे राज्यपाल होते त्यांना मणिपूरला पाठवा. मणिपूरमध्ये शांती करायची असेल तर तिकडे ईडी पाठवा, बघा शांत होते का? असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. माझी लढाई मोदींशी नाही, तर तानाशाहीशी आहे. आधी मुघल आले, त्यानंतर इंग्रज आले.

मी काँग्रेस सोबत गेलो, पण काँग्रेस सोबत जाण्यासाठी कोणी मजबूर केले? 25 वर्षे भाजपासोबत होतो. त्यांनीच युती तोडली, त्यामुळे आपल्याला घंटा बडवणारा हिंदू नको. तर आतंकवाद मिटवणारा हिंदू हवा आहे. खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा काढायचा आहे. मणिपूर जळत आहे, हेच हिंदुत्व आहे का?- उद्धव ठाकरे

मोदींच्या इंडियाच्या टीकेला ठाकरेंचे उत्तर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची आघाडी इंडियाची तुलना इंडियन मुजाहिदीनशी केली. यावर ठाकरे म्हणाले, की आम्ही काय आतंकवादी आहोत का? मोदी जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करतात, तेव्हा ते इंडियाचे प्रतिनिधित्व करतात. मग ते सुद्धा आतंकवादी झाले का? असा टोला ठाकरेंनी लगावला. राम मंदिर बनले ते काय मोदींनी बनवले नाही. ते कोर्टाच्या निर्णयाने झाले आहे. अयोध्येला गेलो तेव्हा एक कायदा बनवा आणि राम मंदिर बनवा, अशी मागणी मी केली होती. भाजपाच्या पक्ष फोडा-फोडीच्या कृतीवरही उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. दुसऱ्या पक्षात असाल तर गाळ आणि भाजपामध्ये आला तर कमळ, अशी टीकाही त्यांनी केली.

गडकरी रंगायतन ही बाळासाहेबांची देण आहे. नाट्यगृह आम्ही दिले. पण नाटक दुसरेच करत आहेत, असा नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. मार्केटमध्ये चायनीज बाहुल्या आल्या आहेत. परीक्षा तेव्हाच असते ते जेव्हा परिस्थिती कठीण असते. त्यामुळे याला मी संधी मनात आहे. मी जर उत्तर भारतीयांसाठी काहीच केले नसते तर एवढ्या संख्येने लोक आलेच नसते. त्यामुळे ही एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन ठाकरेंनी यावेळी केले.

ठाणे म्हणजे निष्ठा -संजय राऊत म्हणाले, की नुसते ठाण्याचे नाव काढले तरी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाने रोमांच उठतात. ठाणे शहर म्हणजे निष्ठा, आज तीच निष्ठा गडकरींच्या रंगायतनात दिसली. काही लोकांना ठाणे सोडून पळावे लागेल, असे वातावरण आहे. ठाणे हे मर्दांचे शहर आहे. हे शहर डरपोकांचे शहर असल्याचे कधी ऐकले नाही. संकट आल्यावर जो पळून जातो तो नामर्द असतो, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.

हेही वाचा-

  1. Maharashtra Monsoon Session 2023: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावरून विधानपरिषदेत खडाजंगी, उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अनिल परब का भडकले?
  2. Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून ठाकरे गट, भाजप आमदारांमध्ये खडाजंगी
  3. Uddhav Thackeray interview: मुंबईला भिकेचा कटोरा आणि दिल्लीसमोर मुजरा करण्याचे षड्यंत्र-उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Last Updated : Jul 30, 2023, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details